अमेरिकन मराठी खाद्य संस्कृती
मार्च महिना, चैत्रगौरीचे दिवस, मी माझ्या एका परिचितांकडे गेले तर काकींनी सहज विचारलं, “पन्हं घेशील?” पन्ह्याचे नाव ऐकताच मी भलतीच खूष झाले, “हो अगदीच आवडेल की” आतून दोन सुबक पेल्यांतून त्या फिक्कट पिवळं, हलके केशरी दैवी पेय घेऊन आल्या! मी…