DHOL TASHA COMPETITION RESULTS

नमस्कार मंडळी,

बृहन महाराष्ट्र मंडळ २०२४ ढोल ताशा स्पर्धेच्या पहिल्या फेरीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुढील संघ पहिल्या फेरीत विजेते ठरले आहेत.

गुणपत्रक

परीक्षकांकडून आलेले गुणपत्रक पुढील प्रमाणे

Gunpatrak Screen Shot 2024 05 05

परीक्षकांबद्दल

श्री सुजीत सोमण

Sujit Soman Dhol

सुजीत हे मागील ३५ वर्षांपासून रमणबाग ढोल ताशा पथकात कार्यरत आहेत. रमणबाग पथकाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पारंपरिक संगीतातील आवडीची छाप, पथकाच्या २१ तालांमध्ये दिसून येते. सुजीत ढोल ताशा वादकासोबतच उत्तम गायक आहेत. ते पहिल्या सारेगमप हिंदी स्पर्धेमध्ये अंतिम १२ गायकांमध्ये होते. याच बरोबर त्यांच्याकडे अभियांत्रिकीची पदवी आहे. १८ वर्ष IT company मध्ये नोकरी केल्या नंतर आता आपली स्वतःची  Cognitive Consilio नावाने company चालवतात, जी Signage : design, manufacturing, consultant या विभागात कार्यरत आहे.

श्री अभिषेक जोरी

Abhishek Jori dhol tasha

ताशांचा पथक म्हणून पुढे आलेल्या गजकेसरी ढोल ताशा पथकाचे प्रमुख हे अभिषेक जोरी आहेत. अभिषेक हे एक पट्टीचे ताशा वादक आहेत त्यांचे इंस्टाग्रामवर ताशा प्रशिक्षणाचे व्हिडिओ ढोल ताशा community मध्ये फेमस आहेत. ताशा वाद्य शिकण्यातील काठिण्य कमी करून ते सुटसुटीत पद्धतीने कसे शिकवता येईल यासाठी ते इंडस्ट्रियल इंजिनीरिंग ची तत्व वापरून, लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतात. याच बरोबर ते फोटोग्राफी फर्म चालवतात आणि ऑडिटर हि आहेत.

परीक्षकांचा अभिप्राय

सुजित सोमण
रमणबाग युवा मंच,पुणे.
 
सगळ्या वादकांची वादने पाहिली, ऐकली…
प्रथमतः आपले सगळ्यांचे कौतुक करावेसे वाटते की आहे त्या resources मध्ये ही संस्कृती आपण सर्वांनी जपून ठेवली आहे आणि ती वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न आपण करीत आहात.
या कष्टांसाठी आपले खूप कौतुक आणि शतश: आभार.
स्पर्धेच्या बाबतीत आता थोड…
१. आपल्याला दिलेल्या वेळेनुसार आपणाला १ मिनिट.एवढं वादन करावयाचे होते..काही संघांनी त्या वेळच्या पुढे जाऊन किंवा वेळेच्या आत वादन केले असल्यामुळे त्यांचे गुण कमी करण्यात आले आहेत…
२. आपल्याला मिळालेल्या वेळात आपण आपल्यातील जास्तीत जास्त कौशल्य कसे दाखवता येईल या गोष्टीकडे पाहण्याचा फारसा विचार संघांकडून झालेला दिसत नाही.. काही संघांचा अपवाद वगळता..
३. दिलेल्या वेळामध्ये जास्तीत जास्त ठेके किंवा चाली दाखवल्याने आपला वादनाचा आवाका किती आहे याचा अंदाज परीक्षकांना येऊ शकतो.तेव्हा याचाही विचार करणे गरजेचे आहे.
 ४. दिलेल्या वेळात कल्लोळ किंवा गजर करणे शकतो टाळावे .जेणे करून आपल्याला मिळालेला वेळ हा आपल्या वादनाला जास्तीत जास्त देता येईल.
( KC पथकाने केलेल्या वादनामध्ये १ मिनिटा पैकी २४ सेकंद ही केवळ कल्लोळात गेली आहेत)
५. मिळालेल्या वेळात एकच चाल ( rhythm) वाजत असल्यामुळे आपल्या आवाक्याचा अंदाज बांधता येत नाही..त्यामुळे परीक्षण करताना, गुण देताना हात आपोआप आखडता घेतला जातो.
६. एका ठेक्यातून दुसऱ्या ठेक्यात जाताना त्यातील सहजता सुध्दा पाहणे गरजेचे असते,जितके सहज संक्रमण तितक्या आपण जास्तीत जास्त चाली बांधू शकतो.
७. वादन करताना आपल्याला ठेका उत्तम जमल्या नंतरच त्या ठेक्यावर डौलाने वाद्य नाचणे साहजिक करावेसे वाटते..पण तो ठेका आपल्याला पूर्णतः जमल्या नंतर..
 
काही गोष्टी अतिशय रोख ठोक पणे सांगतो आहे कारण आपल्याला वादना मध्ये सुधारणा करण्यास खूप वाव आहे,आणि सर्व वादक इतके कष्ट घेत असाल तर ते योग्य पद्धतीने घेणे तितकेच गरजेचे आणि फायद्याचेही ठरेल,म्हणून कौतका बरोबर थोडा कडवटपणा देखील टिप्पणी मध्ये आला आहे, तो आपण सर्वजण खुल्या मनाने, वादक वृत्तीने घ्याल यात कडीमात्रही शंका नाही.
 

शिवा :

मिळालेल्या वेळात आपण ३ चाली ( ठेके / rhythm) सादर केले, ज्यात तोड पण छान होती..पण अजूनही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वादनाचे हात,प्रकार किंवा ठेके कसे दाखवता येतील या कडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच आपले ढोल वादक तसे तयारीचे दिसतात मग ताशाच्या बोलांमध्ये अजून विविधता अपेक्षित आहे .थोडक्यात कालात वादन करायचा प्रयत्न करा.

आवर्तन :

आपल्या वादनामध्ये ३ चाली तसेच तिहाई चा समवेश होता, चाली छान वाजल्या आहेत,पण अजूनही वादकाला “त्या लयी मध्ये जो आघात अपेक्षित आहे तो आणता येत नाहीये,त्यामुळे जास्त लय असलेल्या चालींचा जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा.
ढोलावर वाजणाऱ्या ठेक्याच्या व्यतिरिक्त ताशाचे वेगळे बोल असतात, ढोल आणि ताशे यावर एकच बोल वाजले असता त्या चालीची किंवा ठेक्याची मज्जा निघून जाते.याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

Kc शिवनेरी :

आपण आपल्या सादरीकरणामध्ये २ चालींचा समावेश केला होता, प्रयत्न उतम होता, परंतु आपल्याला जेव्हा एक मिनिटाचा अवधी मिळालेला असतो तेव्हा आपण टी वेळेचा पुरेपूर वापर करण्यावर विचार करावा..
तुम्ही कल्लोळ ( गजर ) वाजवलात,झाला होता छान,.पण त्यातच आपले २४ सेकंद वापरले गेले, माझ्या दृष्टीने एका मिनिटा मधील २४ सेकंद कल्लोळला वापरल्या नंतर आपणा कडे विविधता दाखवण्याचा वेळ उरत नाही. या कारणामुळे आपण आपल्या गुणपत्रिकेतील गुण गमावून बसतो. तेव्हा यावर विचार करण्याची गरज आहे.

गुरू गर्जना :

आपण २ चालींचे सादरीकरण पाठवले आहे, त्यात दुसऱ्या चालीचे जास्तीत जास्त वादनाचे चित्रीकरण आपल्या सादरीकरणात आहे, हरकत नाही…परंतु आपण आपल्या चाली किंवा ठेके जर एकत्रीत पणे इतके चांगले वाजवत आहात तर मग स्पर्धेच्या दृष्टीने आपणाकडून अधिकाधिक चालींची अपेक्षा आहे..
आत्ताच्या सादरीकरणात आपण उत्तम वादन केलेलं आहे, फक्त ठेके किंवा चालींची संख्या वाढवा.

Las Vegas मराठी मंडळ :

आपण आपल्या सादरीकरणात २ चाली घेऊन उतरला होतात, ज्या मध्ये अजूनही सादरीकरणाचा अभाव मला जाणवला… आपल्या पहिल्या चालीमधील ठेक्याचे विभाजन  (sepration) मला अपुरे वाटले, जो ठेका आपण वाजवत आहात तो नक्की कोणत्या प्रकारात मोडला जाऊ शकतो याचा मला थोडा अंदाज चुकीचा वाटला..आपण आपल्याला दिलेल्या वेळेच्या आधीच वादन संपवील्यामुळे आपल्या गुणसंख्येत त्याची उणीव आपोआप पडली, तसेच कल्लोळ चा वापर जास्त झाल्यामुळे ठेक्यांमधील विविधता पाहायला मिळाली नाही.
शिवम : महाकाल, तिहाई,रेल्वे अशा आपल्या चालींनी आपण आपल्या वादनात मजा आणली आहे, या सगळ्यात आपली एकी दिसून येते, ढोल ताशा हा एक सांघिक प्रकार असल्याने आपल्यातील संघ एकत्रित काम करताना दिसला ज्यामुळे आपल्या गुण संख्येत वाढ झाली..अजूनही आपण पाठविलेल्या चालींमध्ये ताशा तसेच ढोलाच्या इतर साहित्याला पण वाव आहे,त्यावर विचार कराल अशी अपेक्षा करतो.

शिवतेज :

काठेवाडी तालातील आपण वादन करतानाचे चित्रीकरण आपण स्पर्धेसाठी पाठविले आहे .
त्यात ठेका उत्तम वाजतो आहे,परंतु ढोलावरील बोल आणि ताशावरील बोल यामध्ये विविधता असेल तर तो ठेका जास्त रंगतो.. तो रंगला देखील,पण पूर्ण एक मिनिट त्याच ठेक्यात रमल्यामुळे आपल्यातील विविधता आपण दाखवयचे राहून गेलो,त्यामुळे आपल्या वादनाचा आवाका  किती आहे याचा अंदाज मला येऊ शकला नाही…
तसेच ठेका वाजवताना वाद्य नाचवणे यासारखे सुख एका वादकाला दुसरे कोणतेच नाही,परंतु तो ठेका आपल्याला जेव्हा पूर्ण जमेल तेव्हाच त्या वादकाने या गोष्टीचे धाडस करावे असे मला वाटते.

PMMM :

अतिशय उत्तम वाद्य रचना..
आपण ज्या आकृती मध्ये वादन करण्यास थांबला होतात ते मुळात फारच प्रशंसनीय होत, प्रत्येक वाद्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता..यासाठी आपले अभिनंदन.
एकूण ३ चाली आपण सादर केल्या..
ज्यामध्ये प्रामुख्याने मला भावलेली गोष्ट म्हणजे कोणत्याही वादनात ज्याला सगळ्यात जास्त महत्व आहे ती म्हणजे गुंफण, एका ठेक्यातून दुसऱ्यात , दुसऱ्यातून तिसऱ्या ठेक्यात जातानाची जी गुंफण ( transition )  होती,ती फारच सुंदर होती..असाच सराव करून आपली प्रगती कराल यात शंका नाही.

अभिषेक जोरी,
गजकेसरी ढोल ताशा पथक, पुणे
 
 यांचा फीडबॅक पॉडकास्ट पद्धतीने रेकॉर्ड केला आहे

पथकांबद्दल

आपण निकाल इंस्टाग्राम वर पण रील द्वारे जाहीर केला आहे, ती रील share करून BMM २४ बरोबर collab करू शकता. Watch Now.

आपला स्नेही,
बृहन महाराष्ट्र मंडळ २०२४ ढोल ताशा स्पर्धा कार्यकारी समिती
महाराष्ट्र मंडळ बे एरिया स्पार्टन्स कार्यकारी समिती

SUBSCRIBE

Stay Connected