Online registration

आठवणी १९९९ च्या अधिवेशनाच्या

ऑन लाइन रजिस्टेशन ची सुरुवात करणारे अधिवेशन

१९९९ चे अधिवेशन झाले तेव्हा  What’s up, face book, google meet, zoom, ह्या आताच्या लोकप्रिय बालकांचा जन्म झाला नव्हता.तेव्हा घरीच सगळ्या मिटींग, व कामे हेात होती.” In person” सतत भेटत असल्याने एकमेकात आपुलकी निर्माण झाली होती. “ आवो जावो घर तुम्हारा असे होते. जेवणाच्या टेबलाची जागा रजिस्ट्रेशन २०-२५ फ़ाईल्सने घेतली होती. प्रत्येकजण  मनाने उठून, चहा, फराळ, जेवण हवे तसे घेऊन, जिथे जागा मिळेल तिथे बसून काम करत हेाते. औपचारिकता नव्हती. “त्यामुळे दुसऱ्या कमिटीतील आलेल्या एक दोघांनी विचारले “ इथे नक्की कोण रहाते?” घर कोणाचे आहे तेच समजत नव्हते. 

१९९९ चा Logo “ नवे पर्व ,नवी दिशा” असा होता . रजिस्ट्रेशन कमिटीने ही “ऑन लाइन रजिस्टेशन” तेव्हा सुरू करून  ही नवी दिशा दाखवली व Logo चे नाव सार्थ केले.

ऑन लाइन रजिस्ट्रेशन हा बदल चटकन स्वीकारला गेला नाही. लगेच लोक  तेव्हा computer friendly नव्हते. सेल फोन  फारसे प्रचलित नव्हते. त्यामुळे  land line ची रिंग सारखी वाजत रहायची.

प्रश्न विचारायला “ East coast” कडच्या लोकांना वेळेचा फरक लक्षात येत नव्हता. एक ग्रहस्थ बहुतेक कामावर जायच्या आधी फोन करत असावेत. त्यांचा सतत ३ दिवस पहाटे  साडे तीन , चार वाजता फोन यायचा. शरद गवळींशी बोलायचे म्हटल्यावर  मी “ते झोपले आहेत “असे सांगून मी झोपून जायची. शेवटी ते चिडले व म्हणाले “ अहो ते शरद गवळी साऽऽरखे झोपलेले कसे असतात हो? मी म्हटले अहो, “शरद गवळीच नाही तर आम्ही सगळेच झोपलेले असतो. आता पहाटेचे ४ वाजलेत”मग म्हणाले , आधि का नाही सांगितले? अहो रात्री १२ वाजता दमून झोपल्यावर तेवढेच शब्द बाहेर पडत हेाते.

पैसे भरुनही एकही कार्यक्रम न बघायला मिळालेले शरद सारखेच काहीजण  होते. सगळ्या श्रमांचे  आता सार्थक होईल असे आम्ही चिडवत होतो. पण चांगलाच? धक्का बसला.

“घक, धक, girl “ beautiful माधुरी दिक्षीत”  येणार हे unannounced surprise रजिस्टेशन टीमला आधी कळले होते. ती नक्कीच registration टेबलावर  येणार किंवा इथूनच जाणार, या आतुरतेने सगळे वाट बघत बसले  होते. पण ती सेलिब्रिटी  होती ना, तिला मागच्या दारातून स्टेजवर नेले गेले. अहो ह्या सगळ्यांचे हृदयाचे ठोके बंद  पडले😀….नाही , नाही चालू राहीले. 🙏🙏

–  रेखा गवळी
रजिस्ट्रेशन टीम ( १९९९)


How can we help you?