खीर:
प्रथम गूळ किसून गूळ बुडेल इतपत पाणी घालून, मिनिटभर Microwave करावे. तयार झालेलं गुळाचं पाणी (गूळ-सिरप) गाळून घ्यावे. कणकेत चिमुटभर मीठ घालून गुळाच्या पाण्यात थोडी घट्टसर कणीक भिजवावी. आता रव्याची खीर होईपर्यंत निदान १० ते १५ मिनिटे कणीक झाकून ठेवावी. रवा तुपावर छान भाजून घेऊन थोडं पाणी घालावं, म्हणजे रवा छान शिजायला मदत होते. मग दूध घालून साखर व कंडेन्स्ड मिल्क घालावे. रव्याच्या खिरीला एक उकळी आल्यावर नारळाचे दूध घालून गॅस बंद करावा. आता कणीक छान मुरली असेल. त्याच्या पोळ्या लाटून शंकरपाळीचे आकार द्यावे की फळं तयार. एकीकडे पाणी गरम करून, चांगले तापल्यावर पण उकळी येण्यापूर्वी कणकेची फळं पाण्यात सोडावीत. शिजल्यावर फळं वर येतात. मग ती फक्त फळं (पाणी नाही), रव्याच्या खिरीत सोडावीत आणि छान एक उकळी घ्यावी म्हणजे समरस होतात. अशी खीर-फळं तयार. आवडी प्रमाणे खिरीत स्वादासाठी वेलची पूड, रंगा साठी केशर, सुका मेवा बारीक करून घालावा.