सप्रेम नमस्कार, पुढील वर्षी, जून २०२४ मध्ये होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनानिमित्त निघणाऱ्या स्मरणिकेसाठी मुखपृष्ठ स्पर्धा जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. स्मरणिकेचा विषय मुखपृष्टामधून प्रतीत व्हावा अशी अपेक्षा आहे. मुखपृष्ठाकरता फक्त चित्र अपेक्षित आहे. स्मरणिका शीर्षक आणि घोषवाक्य मुखपृष्ठावर घालण्याचे काम स्मरणिका टीम करेल.