बालमित्र-मैत्रिणिनो, बे एरिया कॅलिफोर्निया इथे होणाऱ्या BMM2024 अधिवेशनाच्या निमित्ताने आपण तयार करत आहोत एक स्मरणिका! तुम्हाला या स्मरणिकेत तुमच्या कविता, चित्रं, किंवा भाषणं यापैकी काही छापून आलं, ई-बुक किंवा ऑडिओ बुक मध्ये प्रकाशित झालं तर आवडेल ना? मग पटापट खाली दिलेले विषय वाचा आणि त्यांना अनुसरून तुमचं साहित्य आम्हाला नक्की पाठवा.
साहित्य स्वीकारण्याचा कालावधी: १ ऑगस्ट २०२३ – ३१ ऑक्टोबर २०२३
चित्रकला – मी पाहिलेलं अमेरिकेतील प्रसिद्ध ठिकाण
६ ते १० वर्षे या वयोगटातील मुलांनी, त्यांनी पाहिलेल्या अमेरिकेतील एखाद्या प्रसिद्ध ठिकाणाचं चित्र काढायचं आहे. नायगारा, ग्रँड कॅनियन, डिस्नीलँड किंवा त्यांना आवडलेलं कोणतही! काही निवडक चित्रे छापील अंकात व ई-बुक मध्ये प्रकाशित होतील.
कॉमिक स्ट्रीप – मी मराठी बोलताना होणाऱ्या गमती
११ ते १४ वर्षे या वयोगटातील मुलांनो, तुम्ही जेव्हा मराठी बोलता, तेव्हा काही गमती होतात का ? या गमती कॉमिक स्ट्रीप मधून आम्हाला दाखवा. ३ ते ५ पॅनेल्स वापरू शकता. चित्र रंगीत असावीत. संवाद मराठीतून लिहिलेले असावेत. कॉमिक स्ट्रीप हाताने पेपर वर चितारलेली किंवा डिजिटल माध्यमातून केली तरीही चालेल. निवडक स्ट्रीपस छापील अंकात व ई बुक मध्ये प्रकाशित होतील.
कविता – माझी आई /माझे बाबा /माझे आजोबा /माझी आजी /माझी शाळा
६ ते १० वर्षे या वयोगटातील मुलांनी, यापैकी कोणत्याही एका विषयावर १०-१२ ओळींची कविता करून ती कविता म्हणायची आहे. मुलांच्या आवाजातील .mp3 format मधील file आम्हाला पाठवायची आहे. क्लिप मधील आवाज, उच्चारण, आणि ऑडिओ क्वालिटी स्पष्ट असावी. काही निवडक कविता ऑडिओ बुक मध्ये प्रकाशित होतील.
वक्तृत्व – जगभरात इंटरनेट बंद झालं तर /सगळे सुपरहिरोज खरे झाले तर / २५ वर्षांनंतर निसर्ग कसा असेल
११ ते १४ वर्षे या वयोगटातील मुलांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर ३ ते ४ मिनिटं बोलायचं आहे. याची .mp3 format मधील file आम्हाला पाठवायची आहे . वेळ ३ ते ४ मिनिटे. क्लिप मधील आवाज, उच्चारण, आणि ऑडिओ क्वालिटी स्पष्ट असावी. निवडक भाषणे ऑडिओ बुक मध्ये येतील.