नमस्कार मंडळी. बृहन-महाराष्ट्रमंडळाचे २०२४ सालचे द्विवार्षिक अधिवेशन कॅलिफोर्नियात सॅन होजे येथे होणार आहे. प्रत्येक अधिवेशनात एक स्मरणिका प्रकाशित केली जाते. २०२४ ची स्मरणिका छापील स्वरूपात असेलच आणि त्याबरोबर इ-बुक आणि ऑडिओ-बुक स्वरूपातही असणार आहे. मराठी माणसाला अमेरिकेचा रंग आणि अमेरिकेला मराठी माणसाचा रंग असा स्मरणिकेचा विषय असणार आहे.
खारीचा वाटा मोलाचा, अर्थात अमेरिकेला तुम्ही दिलेला रंग म्हणजेच तुम्ही दिलेलं योगदान. तुमच्या काही दशकांच्या वास्तव्यात ह्या कर्मभूमीसाठी तुम्ही काय केलंत, तुमची स्वयंसेवा, समाजसेवा यांचे अनुभव किंवा तुम्ही इथल्या लोकांना दिलेले मार्गदर्शन याबद्दल जरूर लिहा.
लाख मोलाची गोष्ट! तुम्हाला अमेरिकेत आलेल्या विविध अनुभवांमधून शिकलेल्या अनेक गोष्टी आज नव्याने आलेल्या मराठी मंडळींना कळाव्या असे तुम्हाला नक्कीच वाटत असेल. अश्या महत्त्वाच्या गोष्टी आणि तुमचा मौल्यवान सल्ला सर्वांना नक्कीच आवडेल.
अमेरिकेतील अ आ इ ….तुम्ही पाहिलेली बदलती अमेरिका, तुमचे अमेरिकेतील गमतीदार अनुभव. कधी आलो कसे आलो, इंटरनेट शिवाय कसे सर्व केले, तसेच अमेरिकेने तुम्हाला काय शिकवले असे अनेक अनुभव तुमच्या गाठीशी नक्कीच आहेत. आम्हाला वाचायला नक्कीच आवडतील.
दुधावरची साय ! हा विषय तुमच्या आवाजात सादर करण्याचा आहे. तुमच्या नातवंडांबद्दल आठवणी, कविता, विनोदी किस्सा, गाणे, विशेषतः तुम्ही नातवंडांकडून काय शिकलात असे आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायचे आहे आणि ऑडिओबुकद्वारे सर्वांना ऐकवायचे आहे.